Share

जिल्हा प्रतिनिधी सय्यद मुदस्सीर यवतमाळ महाराष्ट्र बातमी व जाहिरातीसाठी संपर्क.9561873226

महागांव (संज्ञान न्यूज़) अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी  सुख, समाधान, शांतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हे जगातील आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अध्यात्मिक केंद्र आहे. सदरील केंद्राचे अध्यात्मिक कार्य १४२ देशांमध्ये अविरतपणे सुरु आहे. महागांवचे अहोभाग्य असे की, गावंडे ले-आउट मध्ये हे केंद्र सुरु झाले आहे.
       आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवाला मन:शांतीची अतिशय गरज आहे. त्यासाठी याठिकाणी ध्यानसाधनेचे (मेडीटेशन) चे दररोज विनामुल्य कार्यक्रम घेतले जातात. विश्वातल्या अखिल मानवाला ताणतणावाशिवाय शांतपणाने, प्रत्येक ठिकाणी, संपुर्ण उर्जा वापरुन सफल जीवन जगता यावे व सर्वांचे कल्याण व्हावे हा वैश्विक मुख्य उद्देश्य आहे.


           या केंद्राच्या माध्यमातुन रक्षाबंधन सकारात्मक विचार गठबंधन कार्यक्रम घेण्यात आला. तुम्ही स्वत: आत्मा असल्यामुळे त्या परमात्म्याचे अस्तित्व जेंव्हा तुम्ही जाणुन घ्याल तेंव्हा तुम्हाला जीवनातील खरे सुख आणि आनंद प्राप्त होईल. असे ब्रम्हाकुमारी निर्मला (दीदी) आपले विचार व्यक्त करतांना म्हणाल्या.
शहरातील सर्व शासकिय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांना दीदींनी राख्या बांधल्या व सकारात्मक विचारांच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड – पुसद चे अनुराग जैन, विलास चव्हाण (पोलीस निरीक्षक महागांव), विश्वांभर राणे (प्रभारी तहसीलदार महागांव), संतोष आगे (न्यायाधिश महागांव), बार कौन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य सुदर्शन देशमुख, डाॅक्टर्स असोशिएशन प्रमुख डाॅ. संतोष मोटरवार, व्यापारी संघटन प्रमुख जगदिशभाऊ नरवाडे, अखिल कुणबी समाज शिक्षण संस्था अध्यक्ष संभाजीदादा नरवाडे, सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष संजय चिंतामणी, संजय भगत, गजानन वाघमारे, रविराज पुं. कावळे, फराजखान पठाण, अमोल राजवाडे, लखन लोंढे इत्यादी मान्यवरांसह इतर मंडळी उपस्थित होती.


Share