Share

जिल्हा प्रतिनिधी सय्यद मुदस्सीर यवतमाळ महाराष्ट्र बातमी व जाहिरातीसाठी संपर्क.9561873226

महागाव (संज्ञान न्यूज़ डेस्क): मानवाच्या तीन मुलभूत गरजांपैकी  निवारा ही मुलभूत गरज महत्वाची असुन महागांव शहरामध्ये अजुन पर्यंत शबरी घरकूल योजनेची अमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्याकरीता हक्काचे घरकूल मिळावे म्हणून येथील आदीवासी समाजाने  पाठपुराव्याअंती साखळी उपोषण/धरणे आंदोलन सुरु केले.


        प्रधानमंत्री आवास व रमाई आवास प्रमाणे आदिवासी समाजाला शबरी घरकूल लाभ देवून २० वर्षापासून सरकारी जमीनीवर राहत असलेल्यांना गाव न. ८ दयावा. सर्वांना जातनिहाय घरकूल योजना कार्यान्वित करावी. रमाई घरकूलचे प्रलंबित १८,०००/- रु. देवून प्रलंबित घरकूल प्रस्ताव जिल्हाप्रशासनाकडे मंजुरीस्तव वर्ग करावे. ईत्यादी मागण्या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. परंतू प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर १३ सप्टे. पासुन आदिवासी समाजाने तहसील समोर साखळी उपोषण व धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. महागांव नगरपंचायत क्षेत्रात घरकूल करिता उपोषण ही जनतेच्या आणी प्रशासनाच्या अंगवळणी पडलेली नेहमीची बाब झाली आहे.

उपोषण केल्याशिवाय दयायचे नाही आणि उपोषण केल्याशिवाय मिळत नाही या अनुभवसिद्ध दृष्टीकोणातुन हे उपोषण केले जात असल्याचे जनमाणसातुन बोलले जात आहे.
      आता या उपोषणाला कितपत यश मिळेल याबाबत जनतेमध्ये उत्सुकता आहे.
      या उपोषणामध्ये गजानन मोरे, नारायण नेवारे, विठ्ठल नेवारे, संजय रणखांब, हरिभाऊ पवार , प्रा. शरद डोंगरे, संतोष ईंगळे, गणेश ढगे, भाऊराव भिसे, कैलास भरकाडे, अमोल मुकाडे, राहुल फोपसे आदी जन उपोषणात सहभागी झाले आहेत.


Share