सोनार समाजाच्या वधू – वर परिचय मेळाव्यात जास्त प्रमाणात मुलींनी सहभाग घ्यावा संजय चिंतामणी, विदर्भ संघटक सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र


सय्यद मुदस्सीर
यवतमाळ (सज्ञान न्यूज़) महागाव.येत्या नऊ एप्रिल रोजी,”सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य”आयोजित.”सर्व शाखीय (सोनार) उपवर -वधू परिचय मेळाव्याचे आयोजन “संदीप मंगलंम, गेडाम नगार यवतमाळ येथे आयोजित केले आहे. ह्या कार्यक्रमाचे प्रमूख उद्घघाटक, म्हणून सोनार समाजाचा भगिनी ऑल इंडिया सोनार फेडरेशन च्या प्रदेश अध्यक्षा, तसेच भाजपा नेत्या सौ चित्रा ताई वाघ ह्या लाभणार आहेत .. ह्या वधू वर मेळावा च्या संदर्भात सोनार सेवा महासंघाचे विदर्भ संघटक (अमरावती विभाग) संजय चिंतामणी यांनी आवाहन केले की” येवढ्या मोठ्या प्रमाणात विदर्भात प्रथमच वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे..


महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मुले मुली भागघेतं आहेत्. तरीपण ह्या मेळाव्यात जास्तीत जास्त विवाह योग्य मुलींनी (वधू) नी सहभाग घ्यावा. कारण बऱ्याचश्या मेळाव्यात विवाह उत्सुक मुलाची संख्या जास्त असते त्यामानाणे मुली ची संख्या अत्यल्प असतें त्यामुळें मेळाव्याचा अपेक्षित उद्देश सफल होत नाहीं. तरी मुलींनी आणि त्याच्या पालकांनी कोणत्याही प्रकारचा कमीपणा न समजता समाज ऋण समजुन भाग घ्यावा शेवटी आणि प्रत्येक मुलींनी सरकारी च वर पाहिजे, ह्यावर अडून बसून वय वाढून घेण्यापेक्षा शिकलेला किंवा व्यापारी वराची निवड करावी, शेवटी अपेक्षित वराची निवड हा आपला अधिकार असतो त्यात कूणी च हस्तक्षेप करु शकणार नाही.. मेळाव्यच्या यशस्वितेकरिता सोनारसेवा महासंघाचे विदर्भ अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत लोळगे आणि जिल्हा संघटक विकास जवळकर, जिल्हा महासचिव श्री बहाड सर, जिल्हा अध्यक्ष ॲड.श्री. हर्षे. जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गोडे, जिल्हा सचिव नानाभाऊ हर्षे. जिल्हा सहसचिव नानाभाऊ खरवडे. आणि इतर विविध संघटनेचे पदाधिकारी वर्ग अहोरात्र मेहनत घेत आहेत.