महामंडळ नियुक्तीसाठी एजाज पटेल नावाची जोरदार चर्चा ढाणकीकरांची तीव्र अपेक्षा

सय्यद मुदस्सीर

यवतमाळ (सज्ञान दृष्टी/न्यूज़) महाविकास आघाडीचे दोन वर्ष सुरळितपणे पुर्ण होत असतांनाच आता महामंडळाच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.आगामी विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांनी अल्पसंख्यक गठ्ठा मतांना आपल्या पारडयात पाडून घेण्यासाठी महामंडळावर एखादा अल्पसंख्याक चेहरा दयावा याची चाचपणी केली जात आहे.
अशातच ढाणकी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे अल्पसंख्यक आघाडीचे तालुका प्रमुख एजाज पटेल एक सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहेत.ते आपल्या सामाजिक कार्याच्या मेहनतीच्या जोरावर राजकारणात कायम असुन शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक मानले जातात.


एजाज भाईच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून अल्पसंख्यांक चेहर्‍याला महामंडळाच्या नियुक्तीसाठी संधी मिळावी अशी ढाणकीकरांची तिव्र अपेक्षा असुन जोरदार चर्चा सुरु आहे.एजाज पटेल सदरील नियुक्तीकरीता योग्य असल्याने अल्पसंख्यांक समाजाचा या दृष्टीने सन्मान व्हावा असे सर्वच घटकातुन बोलले जात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: