महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे गावठी दारूच्या व्या वसायिकाचे मनोबल वाढले. पोलिसांचे अर्थपूर्ण सबंध,, डोंगरगाव महिला बचत गटाचा एल्गार

सय्यद मुदसीर
यवतमाळ (सज्ञान दृष्टी)। यवतमाळ महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे गावठी वाळू करणाऱ्यां अवैध गावठी दारू व्यवसायिकांचे मनोबल एवढे वाढले की, आम्ही पोलीस यंत्रणा सांभाळतो आहे . दरमहा आर्थिक बाजरा सदिच्छा भेटीमुळे आमचे कुणीच काही करू शकत नाही अशा अविर्भावात हे महाभाग मध धुंद अवस्थेत ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये गोंधळ घालत असतात परिणामी गावच्या विकास कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. गावातील तरुण पिढी विद्यार्थी या गावठी दारूच्या नसेसाठी अधीन जात आहेत.

अशा आशयाचे निवेदन 10 ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनावर 46 ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. डोंगरगाव हे गाव पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून या ठिकाणी जवळपास सात आठ गावठी दारू गाळप करणाऱ्या अवैध व्यवसायिकांचे मनोबल वाढलेले आहे. दिलेल्या निवेदनावर सय्यद शफी सय्यद रजाक माजी उपसरपंच, सदाशिव हाडसे ग्राप सदस्य, सय्यद मुदसिर पत्रकार,शै.तोफीक.शै तय्याब तसेच महिला मंडळ, आणि गावकरी मंडळी डोंगरगाव यांनी राज्याचे मुख्यमंत्री, विभागीय पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग यवतमाळ, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केली आहे।