खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ;हिंगोलीत समाजकार्य महाविद्यालय मंजूर।


सय्यद मुदसीर
यवतमाळ (सज्ञान न्यूज़)।यवतमाळ.हिंगोली येथे नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्यात यावे ही मागणी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होती याबाबत मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर अखेर त्या पाठपुराव्याला यश आले आहे.मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस सरकारचे आभार.हिंगोली जिल्हा आणि एकूणच लोकसभा मतदारसंघाचा शैक्षणिक असमतोल दूर करण्यासाठी हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सामाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी करण्यात केली होती व वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला होता .त्यास शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.हिंगोली जिल्हा आदिवासी बहुलभाग म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातील गुणवंत,गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागत होते.परंतु आता विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड यामुळे थांबणार असून समाजकार्याचे शिक्षण आता आपल्या हिंगोली जिल्ह्यातच मिळणार आहे.