महागाव तालुक्यातील मौजे अंबोडा येथे अवैध गावठी दारूचे डोकेवर काढले आहे.

सय्यद मुदसीर

यवतमाळ ( सज्ञान न्यूज़)। यवतमाळ
महागाव तालुक्यातील मौजे अंबोडा येथील ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना अल्ताफ खान जलील खान यांनी अंबोडा गावातील तांड्यामध्ये अवैध गावठी दारू विक्रेत्यावर बंदोबस्त करणे बाबत ग्रामपंचायत कार्यालय अंबोडा, सरपंच यांना गावठी दारू विक्रेत्यावर मुस्क्या आवळण्यासाठी ठराव घेणे बाबत एका निवेदन द्वारे माहिती दिली आहे. अल्ताफ खान यांनी निवेदनात म्हंटले आहे की माझ्या घराच्या पाठीमागे तुळशीराम पवार दारू विकत आहे. आणि दारू पिणाऱ्या लोकांना सांगत आहे की माझ्या घरच्या समोरच्या लोकांचा खूप त्रास आहे.कारण मी दारु विकत आहे.मात्र महागांव पोलीस स्टेशनला हप्ता देतो आणि हे कालचा मुलगा किती उड्या मारत आहे. काय माझं वाकड होणार याच्याशी असे मुजुरीने बोलत असतो आणि रोज गावातील बाहेर गावातील लोक येऊन दारू पिऊन आमच्या घरासमोर उभ्यानं मुतत असतात आणि शिवीगाळ करत असतात आणि जातीवादी तेड निर्माण करण्याचे आगाऊ भाषेमध्ये शिवीगाळ करत असतात त्याच्यामुळे आमच्या घरातील महिलांना बाहेर निघणे म्हणजे खूप कठीण व त्रास भोगाव लागत आहे. आता या निवेदन वर ग्रामपंचायत कार्यालय काय निर्णय घेतील यावर माझं आणि माझ्या गल्लीतल्या लोकांचं लक्ष आहे. अवैध गावठी दारू विकणारा तुळशीराम पवार यांच्या दारूभट्टीवर कित्येक वेळा एलसीबीने आणि महागांव पोलीस स्टेशनला धाड मारली असता आणि अनेक केसेस बुक झालेले आहेत त्यांच्यावर तरी यांचा माज कमी होत नाही आहे. महाराष्ट्र मध्ये दारूबंदी कायदा किती दिवसापासून सुरू आहे. महागाव पोलीस स्टेशन ग्रामपंचायत आंबोडा सरपंच हे याच्यावर काय निर्णय घेतील गावातील प्रतिष्ठान नागरिक यांच्या चव्हाट्यावर बसून बोलत आहेत. मांगे महागांव तालुक्यात पोलीस स्टेशनमध्ये पी.आय विलास चव्हाण होते. त्यांच्या कार्यकाळ मध्ये अनेकदा अंबोडा गावामध्ये दारूभट्टीवर धाड मारण्यात आली. मात्र आता महागाव पोलीस स्टेशनला थानेदार नसल्यामुळे प्रभारी इन्चार्ज काय याच्यावर दखल घेतील आणि काय कारवाई करतील यावर गावातील उच्च नागरिकांमधून बोलले जात आहे।

About Author

Leave a Reply

%d bloggers like this: