अवैध रेती साठा प्रकरणी तहसील व नायब तहसीलदार यांच्यावर कारवाई करा.जनआंदोलन समितीचे जगदीश नरवाडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.


सय्यद मुदसीर यवतमाळ सज्ञान दृष्टी यवतमाळ
महागाव.
अवैध रेती साठा प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी याचे निलंबन करण्यात आले परंतु या रेती तस्करीला अभय देणाऱ्या तहसीलदार व नायब तहसिलदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महागाव तालुक्यात पैनगंगा, पुस,शिप या नद्यांच्या पात्रामधुन रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होत असुन यावर प्रशासनाचा कोणताही अंकुश नाही याला कारण रेती तस्कर व तहसीलदार यांचे सुमधुर संबंध जबाबदार असुन जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईत मंडळ अधिकारी तलाठी यांना जबाबदार धरीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली परंतु तालुक्यात अवैध रेती उत्खनन होत असल्याची माहिती असुन सुद्धा तहसीलदार व नायब तहसीलदार यावर कोणतीही कारवाई करीत नाहीत म्हणजे यामध्ये नेमके कोणते गौडबंगाल आहे यांची शहानिशा करण्याची गरज असुन या तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या कॉल डिटेल्स व संपत्ती ची चौकशी करून त्यांच्याकडुन महसुल अधिनियमानुसार दंड वसूल करण्यात येवुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
.चौकट
अवैध रेती तस्करीवर जिल्हाधिकाऱ्यांना रात्रभर मुक्काम ठोकुन कारवाई करावी लागत असेल तर या रेती तस्करांसोबत प्रभारी तहसिलदार याचे संबंध किती दाट असतील याची प्रचिती येत असुन यावर पायबंद घालण्यासाठी कायमस्वरूपी तहसीलदार नेमण्याची गरज आहे.जगदीश नरवाडे
संस्थापक अध्यक्ष जनआंदोलन आधार संघर्ष समिती