पेट्रोल अंगावर टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्नपोलीस स्टेशन महागाव येथील घटना।


सय्यद मुदसीर
यवतमाळ (सज्ञान न्यूज़) यवतमाळ.महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी समाधान राऊत रा कलगाव यांना विनाकारण मारहाण केली होती त्या अनुषंगाने दिनांक 14 /2/2023 रोजी त्यांची लेखी तक्रार दिली होती
आणि तक्रारी मध्ये नमूद सुद्धा केले होते की संबंधित पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्यावर कारवाई न झाल्यास दिनांक 1 मार्च 2023 ला आत्मदहन करेल असा इशारा सुद्धा तक्रार करते समाधान राऊत यांनी दिला होता
परंतु या तक्रारीला लोटून आज सोळा दिवस पूर्ण झाले परंतु पोलीस प्रशासनाने कारवाई तर केलीच नाही परंतु तक्रार करताना सुद्धा विश्वासात घेतले नाही म्हणून तक्रार करता समाधान राऊत यांनी आज थेट महागाव पोलीस स्टेशन गाठून स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.घडलेला हा प्रकार निंदनीय असून
प्रभारी अधिकाऱ्याचे महागाव तालुक्यात अंकुश नसल्याने बेलगाम बेताल तालुका झालेला आहे सर्वच कार्यालयामध्ये सक्षम अधिकारी नसल्यामुळे
निर्णय घेतल्या जात नाहीत त्यामुळे इथे सक्षम अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे
जगदीश नरवाडे संस्थापक अध्यक्ष
जन आंदोलन आधार संघर्ष आधार समिती