“ महागाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीने केले आंदोलन।


सय्यद मुदसीर
यवतमाळ (सज्ञान दृष्टी)।यवतमाळ.महागांव महागाई विरोधात महिला दिनाच्या ओचीत्य साधून महागाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीने केले महगांव येथे आदोलण केंद्र सरकारने सत्तेवर येण्या अगोदर जनतेला महागाई कमी करण्यासंदर्भात मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु सध्य स्थितीत केंद्र सरकारला याचा विसर पडलेला आहे. गॅस चे दर रोज – रोज वाढत आहे त्या मुळे महिलाचे घरचे बजेट बिघडत चालेला आहे ज्या पद्धतीने स्मृती इरानी यांनी काग्रेस च्या काळात सिलेंडर घेऊन चोकात आदोलन केले होते पण आज गॅस चे भाव कुठल्या कुठे नेऊन ठेवले आता त्या स्मृती इराणी कुठे आहे हा प्रश्न सर्व महिलाना पडला आहे त्या मुळे आज महिलांचा उद्रेक झाला शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकत्यांने स्मृती इराणी च्या फोटोला चपला मारुण निषेध व्यक्त केला ज्यामुळे तर कमीत कमी केंद्र सरकारला त्याची लाज वाटून ते महागाई कमी करतील असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला त्यानंतर तहसील दार मार्फत मुख्यमत्री साहेबांना निवेदन देण्यात आले .या आंदोलनात महिला आघाडी जिल्हा संघटीका निर्मला विनकरे , सुनीता राठोड , कविता मोरे, मंजुषा वानखेडे, सुनीता लहू राठोड, जयश्री चव्हाण, अनीता डोंगरदिवे, वैशाली पवार, युवासेना जिल्हाप्रमुख विशाल प्रकाश पांडे, तालुका संघटक रविंद्र भारती , शहरप्रमुख तेजेस नरवाडे , शहरसंघटक अनील गव्हाणे , भिमराव भालेराव, राजू धोतरकर , शुभम सरगर आदि शिवसैनिक उपस्थित होते