हादगावच्या सहा वर्षीय नौमानखान ने केला पवित्र रमजान चा रोजा..


सय्यद मुदसीर
यवतमाळ (सज्ञान न्यूज़)। यवतमाळ नांदेड जिल्ह्यातील हादगाव या तालुक्याच्या ठिकाणी न्यू गोल्डन ट्रान्सपोर्ट चे संचालक यांचा साडेसहा वर्षीय सुपुत्र नौमानखान याने एवढ्या लहान वयात सतत रोजाचा महिनाभर पवित्र रमजान चा उपवास ठेवून अल्लाहाची मनोभावे उपासना केली. या छोट्याशा बालकाच्या धार्मिक कार्याला परिसरात कौतुक ची शाबासकी तर मिळतच आहे. अशी श्रद्धावान, सुसंस्कारी पिढी घडविल्याने राष्ट्रीय एकात्मता, बंधूभाव सलोखा निर्माण होण्यास परिस्थिती निर्माण होऊन समाजात अशा प्रकारचे आदर्श बालके तयार होण्यास मदत होईल असे विचार गोजेगाव येथील माजी सरपंच हाजी अयुब खान मनसब खान यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले आहे. यावेळी मुक्ती अजित खान हाजी रशीद खान अन्वर खान, कंदीर खान अन्वर खान, सलमान खान, मुसब्बीर खान अदनान खान, अरबाज खान सि परिसरातील सर्व नातेवाईकांनी चाहत्यांनी नौमान यास पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या।