उमरखेड-महागाव तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेचे आयोजन

सय्यद मुदसीर

यवतमाळ (सज्ञान न्यूज)। यवतमाळ कृषी विभाग क्षत्रीय अधिकारी कर्मचारी व कृषी विक्रेते संचालक यांनी समन्वय साधून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा वेळेत व उच्च दर्जाचे पुरवठा करण्याचे उमरखेड महागाव मतदार संघाचे आमदार मा. श्री. नामदेव ससाने यांचे निर्देश.उमरखेड दि.1 मे 2023 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी उमरखेड व महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने मा.आ.श्री. नामदेव ससाने यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेचे आयोजन संजोग भवन उमरखेड येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

मंचावर उपस्थित उमरखेड आत्मा कमिटीचे अध्यक्ष मा.श्री भाऊराव चव्हाण महागाव आत्मा कमिटीचे अध्यक्ष चलमेलवार, प्रवीण पाटील मिरासे, सुदर्शन पाटील रावते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गंगाधर बळवंतकर तालुका कृषी अधिकारी उमरखेड यांनी केले प्रास्ताविक भाषणामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध शासकीय योजना क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान केले विशेषतः प्रधानमंत्री पिक विमा योजना मध्ये झालेला बदल प्रति शेतकरी विमा दर एक रुपया झाल्याबाबत व स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये मध्ये बदल करून गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान तालुकास्तरीय समितीमार्फत प्रकरणे निकाली काढण्याचे माहिती दिली व सदर योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याबाबत आपल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या त्यानंतर कार्यक्रमाचा औपचारिक भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी श्री विजय मुखाडे साहेब यांनी महागाव तालुक्याचा संक्षिप्त पीक नियोजन आराखडा सादर केला त्यामध्ये विशेषतः 10% अधिक क्षेत्रावर ठिबक पद्धतीने कापूस लागवड करण्याचे शेतकरी व उपस्थितांना आवाहन केले. श्री चितंगराव कदम सर मा.जि. प.सदस्य यांनी कृषी विभाग व कृषी निविष्ठा विक्रेते यांना शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा बाबत वेळेत सेवा सुविधा पुरविण्याबाबत माफक अपेक्षा व्यक्त केल्या व कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांचे प्रशंसनीय कामाबाबत कौतुक व्यक्त केले
सुकळी जहागीर येथील प्रयोगशील शेतकरी श्री गजानन वानखेडे यांनी कृषी विभागाच्या विशेषतः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत बीजोत्पादन कार्यक्रम,सरीवरंबा लागवड पद्धत, ठिबक व तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड इत्यादी योजना यशस्वीरित्या राबविल्याचे कौतुक केले. कृषी सहाय्यक श्री प्रकाश पवार, समूह सहाय्यक गणपत कोटकर याच्या मार्गदर्शणाने परिसरातील शेतकऱ्यांना मोलाचे सहकार्य लाभले असे समाधान व्यक्त केले.
तालुक्यातील कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री आनंद गोविंदवार यांनी बियाणे उत्पादक कंपन्यांनी बियाण्याचे बाजारीकरण न करता शेतकऱ्यांना नवीन जातीचे बियाणे दर्जेदार गुणवत्तापूर्ण व अल्प दरात उपलब्ध करून देण्याबाबत मनोगत व्यक्त केले. तालुक्यातील उद्यान पंडित पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री अशोक अण्णा वानखेडे यांनी हवामानामध्ये झालेला बदल याबाबत शेतकऱ्यांनी जागरूक राहून शेती करण्याचे आव्हान केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ. नामदेवरावजी ससाने यांनी कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या महत्वकांक्षी योजना त्यामध्ये मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक तुषार, शेततळे अस्तरीकरण शीतगृह पॅक हाऊस इत्यादी योजनांचा कृषी विभागाशी संपर्क साधून मतदारसंघातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान केले कृषी विक्रेते संघ व कृषी विभाग प्रशासनास येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा पुरविण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश दिले.
सदर कार्यक्रम प्रसंगी विभागीय कृषी पर्यवेक्षक परीक्षेमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबाबत कृषी सहाय्यक श्री. सोमनाथ जाधव, श्री. विवेक मुसने, श्री. विशाल पवार यांचा सत्कार मा. आमदार महोदय यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत गुंडारे कृषी पर्यवेक्षक यांनी केले तसेच त्यांनी शेतकऱ्यांना आपल्या स्तरावर बियाणे उगम क्षमता तपासणी बीजप्रक्रिया चे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री प्रकाश पवार कृषी सहाय्यक यांनी केले सदर कार्यक्रम प्रसंगी उमरखेड व महागाव तालुका कृषी विभागातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी, पदाधिकारी, प्रयोगशील शेतकरी , कृषी मित्र, आत्मा समितीचे अध्यक्ष, कृषी निविष्ठा विक्रेते संचालक प्रतिनिधी, महिला कर्मचारी मतदारसंघातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव तसेच तालुक्यातील विविध वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री लिंबाळकर मंडळ कृषी अधिकारी श्री सोनटक्के मंडळ कृषी अधिकारी
श्री. बाळानंद शिरशेवाड, श्री. रत्नदीप धुळे बीटीएम,श्री.पि.जी.बैनवाड व सौ सुवर्णमाला पायघन मॅडम,यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले.

About Author

Leave a Reply

%d bloggers like this: