प्राथमिक मराठी शाळा फुलसावंगी येथील शिक्षकाचे पदे तात्काळ भरण्यात यावी :-योगेश वाजपेयी

सय्यद मुदसीर यवतमाळ सज्ञान न्यूज़ यवतमाळ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा फुलसावंगी येथील रिक्त असलेली शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावी याकरिता योगेश वाजपेयी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी काल दिनांक चार मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे प्राथमिक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा फुलसावंगी येथे एकूण विद्यार्थी 305 असून मराठी व सेमी इंग्रजी असे आठ वर्ग चालतात शाळेमध्ये 13 पदे मंजूर असताना फक्त चार शिक्षक कार्यरत होते.यामधून दोन शिक्षकांची अंतर जिल्हा बदली मध्ये बदली झालेली आहे.आता शाळेत फक्त दोन शिक्षक कार्यरत आहे.त्यामुळे येणाऱ्या सत्रामध्ये तालुक्यातील सर्वात मोठ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याकरिता वानवा होणार आहे. सध्या जिल्हा परिषद येथे शिक्षकांच्या बदल्यांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.आंतरजिल्हा बदली मधून बाहेर जिल्ह्यातून मोठ्या संख्येत शिक्षक यवतमाळ जिल्ह्यात आलेले आहेत. त्यामधून 11 शिक्षक येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय मराठी शाळेला देण्यात यावे.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश वाजपेयी,रवींद्र पांढरे, प्रशांत महाजन,मुख्याध्यापक अशोक नलमेलवार,सचिन गोरे उपस्थित होते.
2018 पासून सातत्याने शिक्षकाची मागणी
महागाव तालुक्यातील सर्वात मोठी प्राथमिक मराठी शाळा असलेली फुलसावंगी येथील शाळेला 2018 पासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे त्रास होत आहे.तेव्हापासून सातत्याने शिक्षकांच्या मागणी करिता शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या वतीने वारंवार निवेदन देण्यात आले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: