नागरिकांनी सहीच्या माध्यमातुन केला संताप व्यक्त(महागाव मध्ये एक सही संतापाची अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद) ।

0

सय्यद मुदसीर यवतमाळ सज्ञान दृष्टी यवतमाळ
महागाव
आपण ज्या राजकीय नेत्यांना आपले अमुल्य मत दिले त्याच राजकीय नेत्यांच्या दलबदलू पणामुळे राज्यात अस्थिरता निर्माण होवु लागल्याने मतदारांमध्ये असलेल्या चिड,संतापला वाट मोकळी करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महागाव येथे आयोजित एक सही संतापाची या अभियानात नागरिकांनी सही करून आपला संताप व्यक्त करीत या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राज्याच्या विकास होवुन राज्य सुजलाम सुफलाम बनले पाहिजे यासाठी राज्यात स्थिर सरकार असणे आवश्यक आहे ही बाब जाणुन मतदारांनी आपल्या घटना दत्त अधिकारांचा वापर करून आपले अमूल्य बहुमत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना दिले परंतु निवडून आलेल्या याच नेते मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी रात्रीतुन दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत नेत्यांच्या अशा दलबदलु पणामुळे राज्याचा विकास कोसोदुर लोटल्या जावून राज्याच्या राजकारणाची दयनीय अवस्था करून ठेवली याचा सर्वसामान्य मतदारांना येणारा राग संताप व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभरात एक सही संतापाची अभियान राबविण्यात आले असुन त्याच अनुषंगाने महागाव येथे मनसेच्या वतीने एक सही संतापाची अभियान घेण्यात आले यामध्ये अनेक नागरिकांनी आपली सही करून संताप व्यक्त केला या अभियानाची सुरुवात महागाव येथील जहाँगीर पठाण,संजय वि.नरवाडे,पत्रकार संजय नरवाडे यांनी सर्वप्रथम आपली स्वाक्षरी करून केली.
या अभियानाच्या यशस्वितेसाठीमनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण,मनसे शहराध्यक्ष संतोष जाधव, मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर, मनविसे शहराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, मनसे तालुकाउपाध्यक्ष देवेंद्र कदम, शेरखान पठाण, ओंकार राऊत,मनविसे तालुकाउपाध्यक्ष अमर चव्हाण, विभाग अध्यक्ष विनोद खोंडे,सुनिल आव्हाड,जीवन मोरथकर,श्रीकांत राऊत,शाखाध्यक्ष अंगद कदम,योगेश राऊत,प्रेमजित जाधव,माधव घोगेवाड,मिथुन राठोड,वैभव कदम,बाळासाहेब शिंदे,गजानन गावंडे,जीवन वाघमारे,सुभाष पवार यांच्यासह मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी परिश्रम घेतले.

चौकट

लोकप्रतिनिधी एकदा निवडून आले की सर्व सामान्य मतदारांकडे पाच वर्ष फिरकुन सुद्धा पाहत नाही आपले नैतिक कर्तव्य पार पाडण्याऐवजी आपल्या स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारत आहेत हे अत्यंत चिड आणणारे असल्याने मी एक मतदार म्हणुन मनसेच्या या अभिनव आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
:- जगदीश नरवाडे(महागाव)

About Author

Leave a Reply

%d