प्राणिशास्ञ विभाग श्री विठ्ठल रूक्मिणी महाविद्यालय सवना द्वारे वन्यजिव सप्ताहाचे आयोजन


सय्यद मुदसीर
यवतमाळ (सज्ञान न्यूज़)। यवतमाळ महागाव तालुक्यातील
श्री विठ्ठल रूक्मिणी महाविद्यालय सवना वन विभाग महाराष्ट्र शासन वनपरिक्षेञ काळी, राष्ट्रीय सेवा योजना व प्राणिशास्ञ विभागाद्वारे दिनांक ३ ते ८ ऑक्टोंबर २०२३ दरम्यान वन्यजिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आहे असुन वरील सप्ताहाचे दरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे उद्घाटन दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी मा. वनपरिक्षेञ अधिकारी श्री. सम्राटजी मेश्राम साहेब , वनपाल श्री संतोषजी बदकुले व वन विभाग काळी, पुसद, महागांव व गुंज येथील वन विभागाच्या अधिका-यांच्या सानिध्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महल्ले सर यांच्या अध्यक्षतेखाली संंपन्न झाला. प्रसंगी कार्यक्रमासाठी व्यासपिठावर रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा. नासिर शेख सर, समाजशास्ञ विभाग प्रमुख प्रा. ठाकरे सर, प्रा. डॉ. झोड सर प्राणिशास्ञ विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंकज वामनराव चौधरी ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. पंकज वा. चौधरी यांनी प्रास्तविकेद्वारे वन्यजिव सप्ताहाचे महत्व विषद करत यावर्षी वनविभाग व शासनाद्वारे नेमुन दिलेला विषय विद्यार्थ्यां समोर मांडला. त्यानंतर वनविभाग कर्मचारी महागाव श्री.धुळे साहेब यांनी वनपरिसंस्था व वन्यजिव या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदशन केले. तसेच प्रमुख पाहुणे वनपरिक्षेञ अधिकारी श्री मेश्राम साहेबांनी नामषेश होवु घातलेल्या वन्य प्रजातींबद्दल मार्गदशन करुन चलचिञपटाद्वारे विद्यार्थ्यांना वनविभागाचे कार्यावर प्रकाश टाकला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महल्ले सर्वांनी प्राणिशास्ञ विभागाला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना वन विभागातील विविध संधी यावर समायोचीत मार्गदर्शन केले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी वन्यजीवांवर आधारीत रांगोळी, पोस्टर, फोटोग्राफी, स्लोगन्स , व लोगो या स्पर्धा वनविभागाद्वारे परीक्षण करुन वन विभागाच्या पोर्टलवर सर्व फोटो अपलोड करण्यात आले. वरील कार्यक्रमाचे संचलन कु. वैष्णवी जांभुळकर बि.एस्सी भाग २ तर आभार कु. निकीता गायकवाड बि. ए भाग २ यांनी केले. वरील कार्यक्रमाच्या यशस्वियतेकरीता बि.एस्सी भाग १, २ व ३ च्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.