
वाढत्या चोरीच्या घटना व अवैध धंद्याच्या विरोधात महागाव तालुका कडकडीत बंद
(शहरासह हिवरा,फुलसावंगी मध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद)
सय्यद मुदस्सीर सज्ञान दृष्टी जिल्हा ब्युरो यवतमाळ
महागाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असुन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी व्यापारी महासंघाच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शहरासह हिवरा, फुलसावंगी येथील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंद मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला।
इतर जिल्ह्यातील हिस्ट्री सीटर महागाव मध्ये येऊन अवैध धंद्यावर राजरोसपणे खेळत आहेत.त्यामध्ये हरल्यानंतर शहर आणि तालुक्यात रेकी करून दिवसा व रात्रीला घरफोड्या करत आहेत. चोरांचा सुळसुळाट झाल्यामुळे तालुक्यातील व्यापाऱ्यासह नागरिक भयभीत झाले आहे. अनेक गावांमध्ये रात्री लोक झोपत नाहीत. गावांमध्ये चौका चौकात नागरिक जागून रात्र काढत आहेत. कधी नव्हे ती आता तालुक्यात अवैध धंद्यामुळे चांगलीच दहशत निर्माण झाली. त्यामुळे इथला व्यापारी वर्गाला असुरक्षित वाटू लागले आहे.अनेक गावातून चोरी गेलेले वाहने ,मुद्देमाल यांचा तपास अद्याप लागलं नाही त्यात पुन्हा चोरीच्या घटना वाढतच आहेत त्यामुळे या चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा।

परिसरात चालू असलेली विविध अवैध धंदे तात्काळ बंद करून न्याय द्यावा अन्यथा अमरावती विभागीय आयुक्त पोलीस संचालक यांची शिष्टमंडळ भेट घेणार असे महागाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी दिला आहे. या बंद मध्ये हिवरा, फुलसावंगी, महागाव शहरातील किराणा व्यापारी ,भुसार व्यापारी ,जनरल स्टोअर्स, कृषी केंद्र ,मेडिकल असोसिएशन स्वीट मार्ट हॉटेल खानावळ या सर्वांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन महागाव तालुका कडकडीत बंद पाळला.
अवैध धंद्यामुळे चोरांचा प्रचंड सुळसुळाट झाला तालुक्यातील व्यापाऱ्यासह नागरिक भय भित झाले आहेत अनेक गावांमध्ये रात्री लोक झोपत नाहीत अनेक गावांमध्ये चौका चौकात नागरिक जागून रात्र काढत आहेत एवढी भीती कधी नव्हे आता तालुक्यात अवैध धंद्यामुळे झाली त्यामुळे इथला व्यापारी असुरक्षित स्वतःला वाटू लागला आहे अनेक गावात चोरी झाली त्यांची रिकवरी झाली नाही
परिसरात चालू असलेल्या अवैध धंदे तात्काळ बंद करून न्याय द्यावा अन्यथा पुढच्या आंदोलनाची दिशा लवकरच ठरवण्यात येईल असे जगदीश नरवाडे महागाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बोलत होते
यावेळी हिवरा फुलसावंगी महागाव शहरातील किराणा व्यापारी भुसार व्यापारी कापड व ड्रेसेस असोसिएशन जनरल स्टोअर्स कृषी केंद्र मेडिकल असोसिएशन या सर्वांनी बंदमध्ये सहभाग घेऊन महागाव तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला महागाव येथून जगदीश नरवाडे सुरेश शर्मा विशाल चक्रवार विजय अरगुलवार सुधीर नरवाडे परवेज सुरैया राजू वाकोडे गणेश हीगाडे सुदाम खंदारे पंकज देशमुख हिवरा विजय बॉम्पिलवार शफी शेठ सूरर्या राजू खोंडे फुलसावंगी विजय महाजन रवी पांडे जानी नवाब गुजाबराव उबाळे गजानन भडगे यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध नोंदवला
महागाव तालुक्यात अवैध धंद्यामुळे चोऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढले दुकान घर बँक फोडी शेतकऱ्यांच्या शेती आवश्यक वस्तू शेतामधून गायब होत असल्यामुळे या बंदमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवून निषेध नोंदविला आवैद्य धंदे बंद नझाल्यास लवकरच विभागीय आयुक्त पोलीस महानिरीक्षक अमरावती यांची तालुक्यातील शिष्ट मंडळ भेट घेणार
जगदीश नरवाडे
अध्यक्ष महागाव तालुका व्यापारी महासंघ