महागाव पोलिसांना मोठे यश चार घरफोडीतील आरोपी गजाआड.
२लाख ७७ हजार ५००रुपयांचा मुद्देमाल जप्त
सय्यद मुदस्सीर जिल्हा ब्युरो
यवतमाळ (संज्ञान न्यूज)।महागाव तालुक्यात घर फोडायचे प्रमाण वाढले होते .महागाव येथील अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप कोँडा तोंडातून कपाटातील सोन्याचा माल रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल तीन लाख 13 हजार नेला असा फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हे नोंद करण्यात आली होते यात कलम ३०५ (A) ३३१ (3) ३३१ (४) ३०५ ( इ) ३३४ (१) ३३१ (४) ३०५ कलम ३३४, ३०५. नुसार गुन्हे दाखल केले आहेत पोलीस अधीक्षक कुमार चिंता पोलीस उप अधीक्षक पियुष जी जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे, राजू खाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सरस्वती राठोड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर अन्नमवार पोलीस उपनिरीक्षक पोलीस अमलदार सुनील चक्के विद्या जाधव बालाजी मार्कड अतिश जरांडे गजानन खरात , संतोष जाधव ,अमित नुळे , दिपक माळे यांनी आरोपीचा शोध लावून आरोपी ओमकार माधव फोपसे वय २५ महागाव येथून त्याला ताब्यात घेतल्या नंतर रलाख ७७ हजार ५०० रु माल जप्त केला त्याला पोलीस ही खाक्या दाखवल्याने त्याने इसाफ बँक महागांव , एक घर फोडी व दराटी पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली व जेवली येथील किरणा दुकान फोडल्याचे सांगितले .
